आरोग्य
शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे[
पोषण,इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात.
आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन्द्रियमना; स्वस्थ इत्यभिधीयते -साचा:चरकसंहिता सूत्रस्थान अध्यात १.४१ आयुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे - समदोष; समाग्निश्च समधातुमलक्रिय; प्रसन्नात्मेन्द्रियमना; स्वस्थ इत्यभिधीयते -साचा:चरकसंहिता सूत्रस्थान अध्यात १.४१
जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानसिक आरोग्य म्हणजे ,"अशी सुस्थिती ज्यात व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांचे आकलन होते , तसेच ती व्यक्ती उपयोगी व लाभदायी काम करू शकते आणि तिचा समाजाच्या घडणीत मोलाचा वाट असतो." नियमित व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते.
देशातील सार्वजनिक आरोग्य
[१] भारतात सर्वव्यापी आरोग्य सेवा राज्ये व संघ राज्यक्षेत्र यांकडून पुरवली जाते. भारतिय संविधानात "लोकांचे पोषण व राहाणीमान हे वाढवणे तसेच लोकांचे आरोग्य सुधारणे ही राज्यांची मूळ जबाबदारी आहे" असे म्हटले आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरण संसदेने १९८३ मध्ये स्विकारले व २००२ मध्ये त्यात सुधारणा केली.[२]
भारतात सरकारी आरोग्य क्षेत्राला समांतर आणि त्यापेक्षा अधिक लोकप्रिय असे खाजगी आरोग्य क्षेत्र आहे. शहरी तसेच ग्रामीण कुटुंबे खाजगी आरोग्य क्षेत्राचा उपयोग जास्त वेळा करतात असे पहणीत आढळून आले आहे.[३]
भारतात आयुष्य मर्यादा सरासरीने ६४/६७ वर्षे (पु/स्त्रि) व बाल म्रुत्युचे प्रमाण १००० बाल जन्मामागे ४६ आहे.[४]
सार्वजनिक आरोग्यसेवा हा ग्रामीण भागासाठी वरदान आहे . ग्रामीण आरोग्यामधे आशा करयकरतींचे योगदान खूप मोठे आहे. आशा कार्यकर्ती हीच ग्रामीण आरोग्याची सर्वेसर्वा आहे.
कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य व कुटुंबनियोजनासंदर्भात देशातील ही सर्वोच्च कार्यकारी यंत्रणा आहे. या मंत्रालयाचा प्रमुख हा कॅबिनेट स्तरावरील मंत्री असतो,त्याला साहाय्य करण्यासाठी राज्यमंत्री व उपमंत्रीदेखील असतात. या मंत्रालयाच्या अंतर्गत खालील विभाग येतात - आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग, आरोग्य संशोधन विभाग, आयुष विभाग(Ayush), नियंत्रण विभाग. या सर्व विभागांचा प्रमुख म्हणून सचिव नेमले जातात. या सर्व विभागांत सुसूत्रता निर्माण होण्यासाठी, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयास तांत्रिक साहाय्य करण्यासाठी, आरोग्य सेवा संचालनालय स्थापन करण्यात आले आहे. आरोग्य संचालनालयाचा प्रमुख हा महासंचालक असतो. राज्यस्तरावर आरोग्याची जबाबदारी, राज्य आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाची असते. याचा प्रमुख हा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो
- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council- MMC)
- या संस्थेची स्थापना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ या राज्याच्या अधिनियमाद्वारे झाली. या परिषदेचे काम लोकशाही तत्त्वाने चालते. आधुनिक वैद्यकशास्त्रातील पदवीधरांची नावनोंदणी करणे हे तिचे प्रमुख कार्य आहे. - या विद्यापीठाचे मुख्यालय असून याची स्थापना ३ जून १९५८ रोजी झाली. डॉ. अरुण जामकर हे या विद्यापीठाचे विद्यमान आहेत.
- महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था
:- महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेची रचना ही त्रिस्तरीय आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केद व उपकेंदे येतात.
- उपकेंद्र (Sub Centre) :- सर्वसाधारणपणे जेथे लोकसंख्या तीन हजार ते पाच हजार आहे येथे हे उपकेंद्र असते. या उपकेंद्रावर एका महिला आरोग्य कार्यकर्तीची नेमणूक करण्यात येते. यांना साहाय्यक परिचारिका दायी (ANM) असे संबोधण्यात येते. त्याचबरोबर एक पुरुष व एक महिला आरोग्य साहाय्यक नेमली जाते. प्रत्येकी सहा उपकेंद्रांसाठी एक पुरुष आरोग्य पर्यवेक्षक नेमला जातो.
- (PHC) :- साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते. जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या साहाय्यासाठी १४ निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते. स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते.
- द्वितीय स्तर :- या स्तरावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व तालुक्याच्या ठिकाणी असलेले सामुदायिक आरोग्य केंद्र यांचा समावेश होतो. जिल्हा रुग्णालय हे प्राथमिक व द्वितीय स्तर यांमध्ये दुवा म्हणून कार्य करतात. जिल्हा रुग्णालयाचा प्रमुख म्हणून प्रमुख वैद्यकीय अधिकारी (CMO) काम करतो. महाराष्ट्रात जिल्हा रुग्णालयांबरोबरच उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले
- ध्येय : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात खर्च केली जाणारी रक्कम दरडोई उत्पन्नाच्या दोन ते तीन टक्क्य़ांपर्यंत नेणे हा याचा महत्त्वाचा उद्देश होता. हा कार्यक्रम देशभरातील ग्रामीण लोकसंख्येपर्यंत आरोग्य सेवा परिणामकारक पुरविण्यासाठी विशेषत: त्या राज्यांसाठी जेथे आरोग्याच्या सेवांचा अभाव आढळतो.
घटक या अभियानाचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत - कुटुंबकल्याण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, शालेय आरोग्य कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम तसेच मेंदूज्वर, इ. रोगांच्या उपचार व नियंत्रणासाठी देशात कार्यक्रम राबवणे.
- आशा स्वयंसेविका योजना .
आशा ही ग्रामीण आरोग्याची आशा ठरली आहे . राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत (ASHA) स्वयंसेविका योजना राबविण्यात येते.
- पात्रता:- आदिवासी क्षेत्रात ज्या स्वयंसेविकेची निवड होणार आहे ती आठवी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी. तिचे वय साधारणत: २० ते ४ या दरम्यान असावे. आदिवासी भागात एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविकेची निवड केली जाते. मात्र बिगरआदिवासी भागात आशा म्हणून काम करणारी स्वयंसेविका दहावी उत्तीर्ण विवाहित महिला असावी. तिचे वय २५ ते ४५ यादरम्यान असावे. शहरी भागात १५०० लोकसंख्येच्या मागे एक अशी स्वयंसेविकेची निवड केली जाते.
- शालेय आरोग्य हा ग्रामीण आरोग्य अभियानाचा मोठा भाग आहे.